वर्धा : जिल्ह्यातील 19 पोलिस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये मोहीम राबवून, जिल्ह्यात अवैधरित्या दारूविक्री तसेच वाहतूक करणाऱ्यांवर एकूण 24 केसेस करून 3 लाख 52 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणात एकूण 24 आरोपींवर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
सेवाग्राम पोलिस ठाणे हद्दीत नाकेबंदी करून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून प्रो. रेड केला असता आरोपी धीरज प्रभाकर खगार (37) रा. हिंदनगर, वर्धा याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. सदर आरोपीच्या ताब्यातून मोपेड क्र. एम. एच. 32 ए.एफ. 4351, विदेशी दारूसाठा असा एकूण 69 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.