पाथरी ग्रामपंचायतीची अतिक्रमण हटाव मोहीम.

 

मंगेश सहारे
दखल न्युज भारत
विशेष प्रतिनिधी सावली
मो.9921057753

सावली – तालुक्यातील पाथरी येथे स्थानिक ग्रामपंचायत आणि महसूल विभाग यांची संयुक्तरित्या मोहीम राबवून अंगणवाडी बांधकामाकरिता निंब चौक पाथरी येथील अतिक्रम हटविण्यात आले.
पाथरी येथील निंब चौक परिसरात असलेल्या महसूल विभागाच्या जागेवर गावातील नागरिकांनी बरेच वर्षांपासून अतिक्रमण करून शेणखताचे खड्डे तयार केले होते. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य होते. या जागेवर गावाच्या हिताचे कार्य करण्याची भावना लक्षात घेऊन पाथरी येथील सरपंच श्री राजेश सिद्धम यांनी अंगणवाडी बनविण्याचा निर्णय घेतला असता होळी चौक आणि निंब चौक येथील छोट्या बालकांना बाजार स्थित अंगणवाडी दूर पडत असल्यामुळे तसेच गावातील लोकसंख्येचा विचार करता या बालकांना जवळ अंगणवाडी उपलब्ध होऊन आपलेच बालक अंगणवाडीत जाणार ही भावना जोपासत संबंधित विषयावर मासिक सभेत ठराव घेऊन त्याचा पाठपुरावा महसूल विभागाकडे करून मंजुरी घेतली असता आज सदर जागेवर अतिक्रमण हटविण्यात आले. यासाठी गावातील काही नागरिकांचा विरोध असल्यामुळे पाथरी ग्रामपंचायत तथा महसूल विभाग यांनी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन संबंधित जागेवर असलेले अतिक्रम जेसीबीने हटवून जागेची सफाई करण्यात आली .
यावेळी मा. कांबळे साहेब नायब तहसिलदार सावली, मा. राजेश सिद्धम सरपंच ग्राम. पं. पाथरी तथा सर्व सदस्य आणि कर्मचारीवृंद, स्थानिक पोलीस प्रशासन पाथरी तसेच स्थानिक महसूल विभाग कर्मचारी पाथरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here