

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. देशाच्या अर्थसंकल्पातील तरतूदींचा देशातील सामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होत असतो. कोरोनातून सावरत असताना आगामी वर्षासाठी सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पातील घोषणानंतर कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महाग णार असा प्रश्न सामान्य लोकांमध्ये असतो. जाणून घेऊयात कोणत्या वस्तूमुळे खिशाला अधिक कात्री लागणार आणि कोणत्या गोष्टी घेणं परवडणार….
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र करदात्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाही. सलग सहाव्या वर्षी करात सवलत देण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. यामुळे करदात्यांची निराशा झाली आहे. तर दुसऱ्या बाजुला देशात डिजिटल चलन आणण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
काय स्वस्त होणार?
कपडे, चामड्याचा वस्तू
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
मोबाईल फोन, चार्जर
हिऱ्याच्या वस्तू, दागिने
शेतीची अवजारे
कॅमेरा लेन्सेस
इंधन स्वस्त होण्याचे संकेत
इम्पोर्टेड केमिकल स्वस्त होणार
काय महागणार?
क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महाग
आयात होणाऱ्या सर्व वस्तूंसाठी मोजावी लागणार अधिक रक्कम