
वर्धा : जिल्ह्यातील सेलू, समुद्रपूर, आष्टी आणि कारंजा या चार नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून त्याचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. याच चार नगरपंचायतींच्या नाराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे साऱ्यांचे लक्ष असताना गुरुवारी मुंबई येथे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), सेलू, समुद्रपूर या तीन नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला असे निघाले असून, या तीन ठिकाणी आता नगराध्यक्ष म्हणून महिला विराजमान होणार आहेत. तर आष्टी नगरपंचायतीसाठी पुरुष पदाचे आरक्षण निघाल्याने येथे पुरुष नगराध्यक्ष राहणार आहे. नगराध्यक्ष म्हणून कुणाची लॉटरी लागते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.