अवैध वृक्षतोड विरोधात जलसमाधी आंदोलन! तोडलेल्या झाडालगत असलेल्या विहिरीत घेतली उडी; अधिकारी घटनास्थळी दाखल

वर्धा : येथील दत्तपूर चैकातील रोडलगत असलेले शेतातील अनेक वर्ष जुन्या मोठ्या वृक्षाची अवैधरित्या कत्तल केल्याची तक्रार करुनही संबंधीत व्यक्तिवर कोणत्याही प्रकारची कारवाई प्रशासनाकडून झाली नसल्याने संतप्त वृक्षप्रेमी पिपल फॉर अॅनिमल्सचे सचिव आशिष गोस्वामी यांनी याच परिसरातील शेतातील विहीरीत उडी घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना सोमवार (ता. ११) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अधिकारी दाखल होत झाड तोडणाऱ्या व्यक्तिवर गुन्हा दाखल केला.

सेवाग्रामकडून दत्तपूरकडे जाणार्या मार्गालगत शेताच्या बाजूला मोठे डैलदार वृक्ष होते. काही दिवसापुर्वी या वृक्षाची मोठी फांदी तोडल्याचे आशिष गोस्वामी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती जिल्हाधिकारी, वनविभाग, सार्वजनीक बांधकाम विभागाला दिली मात्र सर्वांनी कारवाईचे आश्वासन देत कोणतीही कारवाई केली नाही. आज श्री गोस्वामी या मार्गाने जात असताना त्यांना येथील मोठे वृक्ष बुडापासून कापलेल्या अवस्थेत आढळून आले त्यामुळे त्यांच्या जीवाची काहिली झाली. त्यांनी त्याच वेळी फेसबूक लाईव्ह करीत सर्व अधिकाऱ्यांना याची माहिती देत एक तासाच्या आत या व्यक्तिच्या विरोधात कारवाईची मागणी केली. मात्र एक तास होवूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने संतप्त झालेल्या आशिष गोस्वामींनी याच झाडालगत असलेल्या विहिरीत थेटे उडी घेत जलसमाधी आंदोलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here