डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उंत्सव समितीच्या वतिने पवनार येथे प्रबोधनात्मक संगितमय कार्यक्रमाचे आयोजन

वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य उंत्सव समितीच्या वतिने पवनार येथे प्रबोधनात्मक संगितमय कार्यक्रम शनिवार (ता.१६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, वार्ड नं. ५ पवनार येथे आयोजित करण्यात आला आहे. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे राष्ट्रीय प्रबोधनकार मनोजराजा गोसावी व स्वराताई तामगाडगे हे सुप्रसिद्ध गायक प्रबोधनात्मक संगितमय गीत सादर करणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय आगलावे जिल्हाध्यक्ष, रि.पा.ई. तथा माजी सभापती, जि.प. वर्धा, विशाल रामटेके जिल्हाध्यक्ष, भिम टायगर सेना यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर्यंती उंत्सव समिती, पवनार यांच्या वतिने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here