“द बर्निंग कंटेनर’चा राष्ट्रीय महामार्गावर थरार! प्रसंगावधानाने जीवीतहानी टळली

तळेगाव : भरधाव कंटेनरचा टायर फुटला. दरम्यान झालेल्या घर्षणाने पाहता पाहता कंटेनरने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून कंटनेरमधून बाहेर न बाहेर पडण्यात यश मिळविल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र पाहता पाहता संपूर्ण कंटेनरने पेट घेतला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग सहावर शनिवारी (ता.15 ) मध्यरात्री तळेगाव नदीपुलावर चिस्तुर गाव शिवारात घडली. ‘द बर्निंग कंटेनरचा’ थरार मात्र अनेकांनी यावेळी अनुभवला.

मिळालेल्या माहितीनुसार एनआय 01 एएफ 4072 क्रमांकाचा कंटेनर मुंबईवरून नागपूरकडे जात होता. दरम्यान राष्ट्रीय माहारावरील चिस्तूर गावाजवळ कंटनेरचा टायर फुटला. कंटनेर अनियंत्रित होऊन नदीवरील पुलाला घासला. या घर्षणात कंटेनरच्या डिझेल टॅकला आग लागली. डिझेल टॅकला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनरमधून सुखरूप बाहेर पडण्यात यश मिळविले. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती तळेगाव पोलिसांना देण्यात आली. रात्री गस्तीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा पळनाटे, जमादार राजेश शाहू सुरज राठोड या सर्वांनी तत्काळ घटनास्थळ गाठून यंत्रणा कामी लावली. आवी व आष्टी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नानंतत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या अपघातात जीवीतहानी झाली नाही, मात्र कंटेनर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. सकाळी आठ वाजेपर्यंत या कंटेनरमधून आगीच्या ज्वाला निघत होत्या. कंटेनरचे टायर पूर्णतः राख झाले होते व फक्त टायरचे तार दिसत होते. हा कंटेनर बघण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here