पत्नी, नातेवाइकांच्या जाचाला कंटाळूनच युवकाची आत्महत्या! सुसाईड नोटने उलगडले आत्महत्येचे कारण

अमरावती : पत्नी व तिच्या माहेरच्या मंडळीच्या त्रासामुळे पतीने आत्महत्या केल्याची घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील संकेत कॉलनीत रविवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. बृजेशप्रताप बहादुरसिंह चौहान (३४, रा. माधव अपार्टमेंट, संकेत कॉलनी) असे मृताचे नाव आहे. गाडगेनगर पोलिसांनी या युवकाच्या मृत्युपूर्व चिठ्ठीवरून पत्नीसह सासरच्या तिघांना अटक केली.

ललित राम गावंडे (३१, रा. कॅम्प रोड), अधिनी ललित गावंडे (३०) व रेखा ऊर्फ रूपाली बृजेशप्रताप चौहान (३५, रा. संकेत कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी पत्नीसह सहा जणांविरुद्ध भादंविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

कौटुंबिक वादामुळे पती त्रस्त

पोलीस सूत्रांनुसार, बृजेशप्रताप चौहान व पत्नी रेखा यांच्या कौटुंबिक कारणांवरून अनेकदा वाद होत होते. बृजेशप्रताप बेरोजगारी व आर्थिक अडचणीमुळे नेहमी सासरच्या मंडळीसोबत वाद व्हायचे. या कौटुंबिक कहलाचे प्रकरण महिला सेलकडे समुपदेशनाकरिता होते. यादरम्यान बृजेशप्रतापने रविवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचमामा केला.

पोलिसांना घटनास्थळी बृजेशप्रतापने मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. यावरून पोलिसांनी पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली, तर अन्य तिघे पसार झाले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here