तिहार जेलमधील फरार बंदीवान वर्धा पोलिसांनी केला जेरबंद

वर्धा : चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा ठोठावलेला तसेच दिल्लीतील तिहार येथील कारागृहातून फरार झालेल्या धनराज संतोष खैरकार याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. विशष म्हणजे धनराज हा मागील १५ वर्षांपासून पोलिसांना चकमा देत होता. शिवाय त्याच्यावर ५ हजारांचे बक्षीस होते.

पोलीस स्टेशन डीबीजी रोड, दिल्ली अ.प.क्र. ६३/२००० कलम ३९४, ३९८, ३४ भादंवि गुन्हयातील आरोपी धनराज संतोष खैरकार याला सदर गुन्ह्यात २००४ मध्ये शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर तो दिल्लीतील तिहार येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. २००५ मध्ये धनराज याने तिहार येथील कारागृहातून पळ काढला. त्यानंतर त्याचा शोध जेलप्रशासन घेत होते. दरम्यान तिहार कारागृह प्रशासनाकडून वर्धा पोलिसांची मदत मागण्यात आली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विशेष चमू तयार करून धनराजचा शोध घेण्यास सुरूवात केली. गोपनीय माहितीच्या आधारे धनराज याला हूडकून काढत ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, स्था.नि.गु. शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सौरभ घरडे, प्रमोद जांभूळकर, संजय बोगा, रामकृष्ण इंगळे, अक्षय राऊत, अल्का कुंभलवार यांनी केली.

बदलविले होते नाव
धनराज याने २८ जून २००८ ला स्वतःचे नाव धनराज संतोष खैरकार ऐवजी यश संतोष खैरकार असे बदलविले. तो स्वप्नील कळबं अपार्टमेंन्ट प्लॅट नंबर ३०२ स्नेहल नगर नागपूर येथे वास्तव्यास होता. आरोपी यांने ले-आऊट पाडून प्लाट खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्यामध्ये त्याने अनेक व्यक्तींचे पैसेही परत न करता तो भूमिगत झाला होता. त्यानंतर त्याने ड्राय फ्रुट खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला. तसेच हा सर्व व्यवहार हा आरोपी ऑनलाईन करीत होता. यश खैरकार हाच धनराज खैरकार आहे, असा संशय बळावल्याने त्याची इतर माहिती काढून शाहनिशा करण्यात आली. तसेच त्याने केलेल्या व्यवहाराचे कागदपत्र पडताळून तिहार जेल न्यू दिल्ली येथून मिळालेल्या माहितीवरून यश संतोष खैरकार हाच धनराज संतोश खैरकार आहे हे निष्पन्न झाल्याने आरोपीस नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले. शिवाय आरोपीस तिहार जेल क्र ३ न्यू दिल्ली येथे दाखल करण्यासाठी पुलगाव पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here