देशी दारुसह वाहन केले जप्त! कारंजा पोलिसांची कारवाई

कारंजा : कारंजा पोलिसांनी होळी सणानिमित्त शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी व पेट्रोलिंग केली. या दरम्यान नागपूर जिल्ह्यातून तालुक्यात येणाऱ्या अवैध दारूच्या वाहनावर कारवाई करीत दारूसह 4 लाख 44 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारंजा (घा.) येथील गोळीबार चौक येथे नाकेबंदी करीत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहन क्रमांक एम. एच. 38, 1435 ही स्कॉर्पिओ गाडी संशयितरीत्या कारंजा येथे येताना दिसून आली.

पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहनाचा पाठलाग केला. वाहन थांबवत तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या एकूण 30 पेट्या मिळून आल्या. आरोपी स्वप्निल पुंडलीकराव वानखडे (26) रा. वॉर्ड क्रमांक 2, माळीपुरा याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलिस निरीक्षक दारासिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन मानकर, विनोद वानखेडे, हर्षल मून, प्रदीप कुंभारे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here