नझुल भूमापकाने गटकले ‘ऑलआऊट’! आत्महत्येच्या प्रयत्नाने उडाली खळबळ; भूमिअभिलेखमध्ये चौकशीचा ससेमिरा

हिंगणघाट : येथील भूमिअभिलेख कार्यालयाबद्दल नागरिकांच्या असलेल्या तक्रारीवरुन सोमवारपासून चौकशीचा ससेमिरा सुरु झाला आहे. आज भूमीअभिलेख उपसंचालक नागपुरची चमू व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असतानाच येथील नझुल भूमापकाने बसस्थानक जवळ ऑलआऊट मॉस्किटो विषारी द्रव्य प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना दुपारी ४ वाजतादरम्यान घडली असून तातडीने उपजिल्हा रूणालयात दाखल करण्यात आले.

प्रशांत बबनराव येते (५२) असे भूमापकाचे नाव आहे. येथील भूमी अभिलेख कार्यालयात आमदार समीर कुणावर यांनी आकस्मिक भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. यात कार्यालयीन दफ्तर दिरंगाई आणि कर्मचा यांच्या गैरव्यवहारावरुन आमदारांनी थेट महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून कार्यालवातील प्रकार त्यांच्यासमोर कथन केला. याचीच दखल घेत भूमी अभिलेख उपसंचालक शिंदे यांनी तीन कर्मचा यांना या कार्यालयात पाठवून प्रकरणाचा निपटारा करण्याचे निर्देश दिले. भूप्री अभिलेख उपसंचालक कार्यालवातील उपअधीक्षक सतीश पवार तसेच वरिष्ठ लिपिक मनिष जांगळे व मृणाल द्रवेकार हे दोन दिवस येथे थांबून नागरिकांचे समस्या जाणून घेणार असून प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करणार आहे. तसेच उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले या सुद्धा या कार्यालयातील गैरप्रकराची चौकशीकरुन सात दिवसात शासनाकडे अहवाल पाठविणार आहे. त्यामुळे भूमिअभिलेख अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याच दरम्यान येथील भूमापक येते यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याने खळबळ उडाली. त्यांना प्रारंभी उपजिल्हा रुग्णालयात तर नंतर सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here