शिवाजी चौक-बजाज चौक मार्गावर खड्डाराज! दुरुस्तीकडे डोळेझाक; मुख्याधिकारी, कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

वर्धा : गणराज हॉटेलसमोरील भागात अमृत-भूमिगत गटारच्या कामात खोदलेल्या रस्त्यावर खोल खडडे पडल्याने अपघात वाढले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बजाज चौक पर्यंतच्या अति रहदारीच्या रस्त्यावरील अमूत भूमिगत गटारच्या कामात पडलेल्या जीवघेण्या खोल खडड्यामूळे दररोज अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे ही बाब लक्षात घेऊन या मार्गावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी नगरपालिकेच्या सभापती रंजना पट्टेवार, सुरेश पट्टेवार यांनी मुख्याधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.

पुढील आठवड्यानंतर अनेक महत्त्वाचे सण असल्याने मार्केटला येणाऱ्या जाणाऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बजाज चौकापर्यंतच्या रस्त्यावर वाढत्या रहदारीच्या दृष्टीने या रस्त्यावरील अमृत भूमिगत गटारीच्या कामात पडलेले जीवघेणे खोल खड्डे कायमस्वरूपी बुजवावे. या रस्त्याची पूर्णतः दुरुस्ती करून जीवघेणे खोल खडे त्वरित बुजवून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, असेही पट्टेवार यांनी म्हटले आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here