ट्रकची ट्रकला धडक! चालक गंभीर जखमी

वडनेर : नजीकच्या दारोडा शिवारातील टोल नाल्याजवळ ट्रकने ट्रकला धडक दिली. यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला.

हा अपघात रविवारी सकाळी ८.3० वाजताच्या सुमारास घडला. आर. जे.०५ जी. बी. ४००९, एम. एच. ०४ बी. एफ. ००४८ व यू. के. ०६ सी.बी. २५०१ क्रमांकाचा ट्रक पांढरकवडाकडून नागपूरच्या दिशेने जात होता. खड्डे चुकविण्याच्या नादात पुढील ट्रक चालकाने ब्रेक मारला. अशातच ट्रकची ट्रकला धडक बसली. यात एक ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी चालकाचे नाव कळू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here