अनैतीक संबधातून सेवानिवृत्त जवानाचा खून! तीघांना अटक

वर्धा : अनैतीन संबधातून सेवानिवृत्त जवानाचा खून करण्यात आल्याची घटना शनिवार (ता. २०) दुपारच्या सूमारास शहरालगतच्या नागठाणा रोड परिसरात व्यंकटेश नगरी येथे घडली. मृत सेवानिवृत्त जवानाचे विजय गणवीर (61) असे नाव आहे. या प्रकरणी सावंगी पोलिसानी मृतक जवानाच्या पत्नी सुनिता गणवीर, रामेश्वर आघाव व संध्या जोगे या तीघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृतक विजय ची पत्नी सुनिता गणवीर हिचे बोरगाव येथील रहिवासी रामेश्वर आघाव यांच्याशी सुत जुळले होते. शनिवार 20 रोजी नेहमीप्रमामे विजय हा नागपूर येथे सैनिक कॅन्टीन मध्ये वस्तू खरेदीसाठी गेला होता. विजय नेहमी उशिरा येत असल्याने सुनिता हिने रामेश्वर याला घरी बोलावुन घेतले. ऐरवी उशिरा येणारा विजय हा शनिवारी दुपारच्या सूमारास घरी आला. पत्नीला परपुरूषाबरोबर पाहून त्यांच्यात वाद झाला. दरम्यान जाडसर वस्तूने डोक्यावर मारुन खून करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसानीं मृतक विजयच्या पत्नीला ताब्यात घेतले. चौकशी केली असता रामेश्वर आघाव तसेच संध्या जोगे यांच्या मदतीने हे घडवुन आणल्याचे सुनिता हिने चौकशीत कबुली दिली. या प्रकरणी तीघांनाही अटक करण्यात आली असून 4 दिवसाच्या पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here