भरधाव कार अनियंत्रीत होऊन झाली पलटी! जिवीतहानी नाही

वर्धा : हिंगणघाट वरुन वर्धेच्या दिशेने येत असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात जाऊन उलटली. ही घटना शुक्रार 2 रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास वायवाग शेतशिवारात कॅनल परीसरात झाला. या अपघातात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार दर्शन शंभरकर (32) रा. रिंग रोड वर्धा हे एम.एच.32 ए.एच.6121 या क्रमांकाच्या कार ने हिंगणघाट वरुन वर्ध्याला येत होते. दरम्यान वायगाव शेतशिवारात असलेल्या कॅनल परिसरात समोरुन येत असलेल्या ट्रकची लाईट डोळ्यावर पडल्याने कारवरील नियंत्रण सुटले. कार अनियंत्रीत होउन रस्त्यालगत असलेल्या ढिगार्‍यारुन पलिकडे असलेल्या कोलांडी खात पडली. वेळीच दर्शन शंभरकर याने कार चे दार उघडत कार बाहेर उडी घेतल्याने थोडक्यात बचावला त्याला किरळोळ जखम आली. या घटनेची माहिती पोलिसांना कळवताच आज 3 रोजी सकाळी घटनास्थळी पोलिस दाखल होत पंचनामा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here