

हिंगणघाट : वडनेर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वणी येथील राजेंद्र वाल्मिकराव ठाकरे वय 68 वर्ष यांनी कर्जा पोटी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटणा उघडकीस आली.
राजेंद्र वाल्मिक ठाकरे यांच्या शेत बोपापूर शिवारात असून त्यांनी आपल्या शेतीच्या बी बियाणासाठी सन 2019 मध्ये पोहना येथील बँक ऑफ इंडिया चे पीक कर्ज घेतले होते. पण सततच्या दुष्काळी परस्तिथी मुळे पीक पाणी होत नव्हते सतत होणाऱ्या दुष्काळामुळे शेती पूर्ण टोट्ट्यात गेली कर्ज द्याचे कुठून हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता कोरोना च्या वाढत्या लॉकडाऊन मुळे मुलगा पण घरीच मग परिवार कसा जगवावा घर खर्च कसा करावा आणि कोणाकडून पैसा आणावा ह्या सर्व तणावापोटी ते चिंतेत राहायचे त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिगडत गेलं त्यामुळे ते आजारी राहायचे या सर्व तनावातून आणि चिंतेतून यांनी वणी शिवरातील इटेकार रा. जांगोना यांच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा सून आणि मुलगी असा परिवार आहेत. त्यांच्या अश्या आकस्मित जाण्यामुळे परिवारावर आता दुःखाचा डोंगर उभा राहिला आहेत. वडणेर पोलीस राजेंद्र शेट्टे यांच्या मागदर्शनात पोलीस कर्मचारी अमित नाईक, लक्ष्मण केंद्रे पुढील तपास करीत आहेत.