गावात तात्काळ फवारणी करा अन्यथा तिव्र आंदोलन! भिम टायगर सेना

पवनार : येथील वॉर्ड क्रमांक एकमध्ये डेग्यूचे दोन रुग्ण आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची गंभार दखल घेत ग्रामपंचायतीने तात्काळ संंपुर्ण गावात फवारणी करावी अन्यथा भिम टायगर सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदणातून म्हण्टले आहे.

येथील अथांग अनिल नगराळे (७) व पायल शंकर राऊत (१६) या दोघांनाही ताप आल्याने त्यांची तपासणी केली असता डेंग्यूच्या आजाराचे निदान झाले. दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या आजाराचा गावात प्रसार होवू नये यासाठी ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भिम टायगर सेनेचे तालुका अध्यक्ष विशाल नगराळे, शाखा अध्यक्ष रविन्द्र चाटे, गणेश खेलकर, राजू लाडे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here