पैशाचा वाद! ‘डीजेवाल्या’ने धारदार शस्त्राने केले सपासप वार; देवळी येथील घटना; जखमीवर उपचार सुरु: आरोपीविरुद्ध गुन्हा

वर्धा : पैशाच्या कारणातून झालेल्या जबर हाणामारीत युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना देवळी येथील आंबेडकर नगर परिसरात घडली. याप्रकरणी १९ रोजी देवळी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मानव आतीष म्हसकर (२१) असे जखमीचे नाव आहे. मानव हा घरी जात असताना आरोपी सागर उर्फ डीजेवाला शेखर सहारे (रा. मिरनाथ लेआऊट) याने रस्त्यात थांबवून तुझ्या आजीने पाण्याच्या कॅनचे तसेच बिछायातचे पैसे का मागितले, असे म्हणत शिवीगाळ करून मानवला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने मारहाण करण्यास सुरुवात केली. मानवच्या कमरेवर, छातीवर गंभीर जखमा झाल्या. मानववर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी आरोपी डीजेवालाविरुद्ध देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here