हद्दपार सोमड्याला इतवारा परिसरातून केली अटक! पंचांसमक्ष त्याची विचारपूस

वर्धा : जिल्ह्यातून हद्दपार असलेला आरोपी कोणतीही परवानगी न घेता जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी दुपारी अडीच वाजतादरम्यान करण्यात आली, सचिन ऊर्फ सोमड्या सुरेश मरस्कोल्हे (२४) रा. बुरड मोहल्ला, वर्धा, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तरीही कोणतीही परवानगी न घेता तो इतवारा परिसरात फिरत असल्याची माहिती जहर पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे पोलीस कर्मचारी दिवाकर परिमल यांनी चमूसह इतरवारा परिसर गाठून त्याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची विचारपूस करून ओळख पटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या सहा महिन्यामध्ये ही हद्दपार आरोपीला ताब्यात घेतल्याची ही तिसरी घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here