हिंगणघाट येथे अवेध दारुसाठा जप्त! आरोपींना अटक

वर्धा : अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर हिंगणघाट पोलिसांनी कारवाई केली. आरोपीकडून दुचाकी आणि दारूसाठा, असा एकूण 1.10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल केला. मुखबीरकडून खाञजीशीर खबर मिळाली की, एक इसम दुचाकी क्रमांक एम एच 32 ए यू 6877 गाडीने देशी दारुची बिनापास परवाना अवैद्धरित्या वाहतूक करुन शास्ञ्री वार्ड हिंगणघाटकडे येत आहे, याच माहितीवरून पोलिसांनी आरोपी नयन रंगराव दंडवते (27, इंदिरा गांधी वार्ड, हिंगणघाट ) याच्यावर प्रोरेड केला.

आरोपी याचे ताब्यातून देशिदारू एकूण 300 शिश्या किंमत 30 हजार रुपये व (दुचाकी किं. 80 हजार रुपये), असा एकूण 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या दारूबाबत विचारणा केली असता त्याने हा माल हा पसार आरोपी सूरज उर्फ शे-या पिंपळकर (रा. दारोडा ह.मु. संत कबीर वार्ड हिंगणघाट) याचा असल्याचे सांगितले. आरोपीला अटक करून गुन्हा नोंद करून तपासात घेतला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नरूल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी आबुराब सोनवने यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि होमकांत मशाखेजी ,पोहवा जगदीश चव्हाण, पोलिस नाईक, स्वप्नील जिवने, पो काँ भारत बुटलेकर, मंगेश वाघमारे, राजेश निबळ, आशिष नेवारे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here