जागेच्या वादातुन युवकास कुऱ्हाडीने मारहाण

अल्लीपूर : जागेच्या कारणातून झालेल्या वादात युवकास कुऱ्हाड मारून जखमी करण्यात आले. तळेगाव टालाटुले येथे ही घटना घडली. प्रभा विक्रम कांबळे हिने शौचालयाचे बांधकाम सुरु केले आहे. ती नळावर पाणी भरण्यास गेली असता प्रशील तेलंगे आणि पंचफुला तेलंगे तेथे आले आणि तुम्ही बांधलेली भींत आमच्या हद्दीत आली असे म्हणत वाद सुरू केला. दरम्यान प्रभाचा मुलगा राहुल वाद सोडविण्यास मध्यस्थी गेला असता प्रशील तेलंगे याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने प्रशीलला मारहाण करीत जखमी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here