Home ◼️ संपादकीय पवनारमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या ; परिसरात हळहळ

पवनारमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या ; परिसरात हळहळ

पवनार : येथील वॉर्ड क्रमांक २ परिसरात एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना समोर आली आहे. श्रीकांत दानव वे 40 वर्षे असे मृत युवकाचे नाव असून, ही घटना शुक्रवार ता. १६ सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत दानव यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे पवनार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!