बारावी परीक्षा रद्द! अन्य प्रवेश कसे होणार? पालक आणि विद्यार्थ्यांचा सवाल; शासन निर्णयामुळे निर्माण झाली संभ्रमावस्था

आर्वी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीपाठोपाठ बारावीची परीक्षाही रद्द झाली आहे. त्यामुळे पदवी व अन्य प्रवेशप्रक्रिया कशी होणार, याची पालक, विद्यार्थ्यांना चिंता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा घेण्याबाबतचे शासनाने सूतोवाच केले होते. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी संभ्रमात होते.

कोरोनामुळे केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेदेखील बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. मात्र, बारावीच्या मूल्यमापन आणि पदवी प्रथम वर्षासह अन्य अभ्यासक्रमाच्या पुढील प्रवेशाचे धोरण सरकारने तातडीने जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी केली. त्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे समजते. दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक प्रवेश परीक्षा घेण्याचे निश्चित केले. त्याचप्रमाणे पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवीसाठीही प्रवेश परीक्षा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवी इंजिनिअरिंग औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय शाखांमधील प्रवेश, केंद्रीय तसेच दरवर्षी होणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.

बारावीनंतर संधी

– बारावीनंतर काय करावे? हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. प्रत्येकासाठी करिअर खूप महत्त्वाचे आहे.
– विद्यार्थी क्षमतेनुसार त्यांचे करिअर निवडतात. विद्यार्थी परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रचंड तयारी करतात. तर काही विद्यार्थी स्वप्नातील नोकरी मिळविण्यासाठी परीक्षेची तयारी करतात. बारावीनंतर संधी कोणती? हा प्रश्न सर्वांनाच पडतो.
– यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाला आणि पारंपरिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, औषधीशास्त्र, प्रशासकीय सेवा, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, फाईन आर्ट्स, इंटरनेट डिझायनिंग, ग्राफिक डिझाईन, होम सायन्स, एअरपोर्ट मॅनेजमेंटसंबंधित कोर्स, बीफार्म, व्यवसायिक पायलट प्रशिक्षण, मर्चंट नेव्ही प्रशिक्षण आदी अनेक संधी उपलब्ध होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here