वाहनासह 4.42 लाखांचा दारूसाठा जप्त! दोघांना अटक; गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

देवळी : दारूची अवैध वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई करून वाहनांसह 4 लाख 42 हजार 600 रुपयांचा देशी, विदेशी दारूसाठा जप्त केला. ही कारवाई 11 एप्रिल रोजी यशोदी नदीचे यवतमाळ-देवळी हायवेवर नाकेबंदी करून करण्यात आली. 11 एप्रिल रोजी चारचाकी वाहनाने अवैधरित्या देशी- विदेशी दारुचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा येथील देवळी तालुक्यात येत असल्याबाबत मुखबीरकडून खात्रीशीर माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशोदी नदीचे यवतमाळ देवळी हायवे पुलावर सापळा रचून नाकेबंदी केली.

एक वाहन येत असल्याने सदर वाहन चालकास थांबविण्याचा इशारा केला असा त्याने वाहन थांबविले. सदर वाहनामध्ये देशी दारुच्या 336 निपा किंमत 33 हजार 600 रुपये, बियर 36 शिश्या किंमत 9 हजार रुपये, चारचाकी वाहन एमएच 32 सी-6985 किंमत 4 लाख रुपये असा एकूण 4 लाख 42 हजार 600 रुपयांचा जप्त करून आरोपी कुणाल नरेंद्र तायवाडे (27) रा. ब्राम्हणपुरा वार्ड क्र. 9 देवळी, संजय भुतजी तेलळकर (21) रा. देशमुखपुरा वार्ड क्र. 17 देवळी यांना अटक करण्यात आली सदर कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत साळुंके यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळसिंग पाटील यांचे मार्गदर्शनात पोलिस अधीक्षक शफकत आमना यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोहवा कुणाल हिवसे, अनिल तिवारी, उमेश गेडाम, आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here