७.१६ लाखांचा मुहेमाल जप्त! वाळू चोरट्यांवर कारवाई; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ट्रॅक्‍टर, ट्रॉलीसह वाळू असा एकूण ७ लाख १६ हजार ८०० रुपयांचा वाळूसाठा जप्त केला आहे. ही कारवाई देवळी पोलिसांनी केली.

वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी छापा मारला असता वाळू चोर ट्रक्टर चालक नितेश अशोक बावनकर, सतीश महादेव पारीसे, धनराज चरणदास निंबोरे महेश उर्फ गजानन मनोहर भानारकर हे एमएच ३२ एएच ८७०९क्र मांकाचा ट्रॅक्टर आणि त्याला लागून असलेली एमएच ३२ एएच ८५६८ क्रमांकाच्या ट्रॉलीत दीड ब्रास वाळू वाहतूक करताना मिळून आले. वाळू चोरट्यांकडून पोलिसांनी ट्रॅक्‍टर व ट्रॉलीसह वाळू असा ७ लाख १६ हजारांचा वाळूसाठा जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सुरु केलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्कारांचेही धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here