जादुटोणा करुन पाऊस पाडण्याच्या प्रकरणात पीडितेच्या आईला अटक! उलगडणार अनेक रहस्य

वर्धा : ८० कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आईसह नातलगांनी पीडितेवर अघोरी कृत्य करून तिचे वर्षभरापासून शोषण केल्याची लज्जास्पद घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याप्रकरणात पीडेतेच्या काकासह तिघांना अटक करण्यात आली होती. रामनगर पोलिसांनी शनिवारी रात्री याप्रकरणात आता पीडितेच्या आईला हिंगणघाट तालुक्यातील येरणगाव येथून अटक केल्याची माहिती असून आरोपी संख्या पाचवर पोहचली आहे. पीडितेच्या आईला अटक झाल्याने आता या प्रकरणातील रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here