लिंकवर क्लिक करताच ट्रॅव्हलिंग बॅग पडली लाखाला

वर्धा : पत्ता चुकीचा असल्याचे सांगून लिंक पाठवत सायबर भामट्याने व्यक्‍तीच्या खात्यातून तब्बल ९९ हजार ९०१ रुपये परस्पर काढून घेतले. व्यक्‍तीला ९९ हजारांना ट्रॅव्हलिंग बॅग आणि पाकीट पडल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दिली.

राहुल देशमुख (रा. कारला रोड) यांनी आरबीएलच्या साईटवर जाऊन त्यांचे पॉइंट रिडंम करून त्यावरून २६०० रुपयांची खरेदी करण्यास पात्र झाल्याने त्यांनी एक पाकीट आणि एक ट्रॅव्हलिंग बॅगची ऑनलाइन खरेदी केली. मात्र, त्यास बँगची डिलिव्हरी पत्ता चुकीचा असल्याचे सांगून पार्सल परत गेल्याचे सायबर भामट्याने सांगितले. काही वेळातच त्यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवून कस्टमर केअरशी संपर्क करण्यास सांगितले, कस्टमर केअरने अँप डाऊनलोड करण्यास सांगितले. राहुलने अप डाऊनलोड करताच त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९०१ रुपये परस्पर वळते झाल्याचा मेसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर ठाण्यात तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here