

वर्धा : गृहरक्षक असलेल्या मद्यपी ‘पतीसह त्याच्या मित्राने आणि सासूने विवाहितेस मानसिक, शरीरिक त्रास दिल्याने विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विवाहितेने याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शीतल शेंडे आणि हरिश्चंद्र शेंडे यांचा २०१८ मध्ये प्रेमविवाह पार पडला; मात्र लग्नाच्या सहा महिने उलटताच हरिश्चंद्र हा. मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन विवाहितेस मानसिक व शारीरिक त्रास देऊ लागला, तसेच सोडचिठ्ठी देण्यासाठी तगादा लावू लागला. प्रशांत क्षीरसागर हा घरी आला असता, त्याने हरिकचंद्रला भडकविले. दरम्यान दोघांत पुन्हा वाद झाला.
विवाहिता प्रशांतला समजाविण्यासाठी तरोडा येथील त्याच्या गावी गेली असता, रात्रीच्या सुमारास हरिशचंद्र दारु पिऊन घरी आला आणि मारहाण करु लागला. सासूनेही शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात विवाहितेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हरिचंद्र शेंडे, अंजना शेंडे, प्रशांत क्षीरसागर यांच्याविरुद्ध रामनगर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.