

समुदपूर : तालुक्यातील मांडगाव येथील कैलास प्रभाकर चंदनखेडे (40) हे कुटुंबाला सोडायला सासुरवाडीला जात असतांना बडको-चहांद रोडवर चहांदच्या पुलावरून रात्री 10 वाजताच्या सुमारास टाटा एस गाडी पुलावरून खाली पलटी झाली. त्यात कैलास चंदनखेडे (40) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या कुंटुबातील चार जण जखमी झाले आहेत. कैळास यांची पत्नी मनीषा गंभीर जखमी झाली असून तिला उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
तसेच कैलास चंदनखेडे यांच्या मुली गुडीया (वय 10) व स्वरा (8) आणि वैभव वरवटकर (30), विजय लोणकर (19) या चौघांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. कैलास यांचा मृतदेह पोस्टमार्टमकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र राळेगाव येथे नेण्यात आला. अपघातातील सर्वजण मांडगाव येथील रहिवासी आहेत. चार दिवसांपूर्वीच नदीत 13 वर्षांचा मुलगा मरण पावला आणि आता हा अपघात झाला. या अपघाताची माहिती गावात पसरताच गावकरी सुन्न झाले असून हळहळ व्यक्त केली जात आहे.