वडापाव देण्यास उशीर झाल्याने छातीत खुपसली कैची! शहरातील शास्त्री चौकातील घटना; पोलिसात तक्रार दाखल

वर्धा : दुकानात गर्दी असल्याने वडापाव देण्यास उशिर झाल्याने अज्ञाताने वडापाव विक्रेत्याच्या छाताती कैची खूपसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले.ही घटना वर शास्त्री चौक परिसरात घडली. या घटनेने नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

संतोष नंदलाल प्रजापति रा. सिंदीमेघे हा शास्त्री चौकात वडापावची गाडी लावतो.सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती वडापाव खाण्यासाठी दुकानात आला मात्र, थोडा उशिर झाल्याने त्याने शिवीगाळ करीत तेथून निघून गेला. काही वेळाने तोच युवक पुन्हा वडापावच्या गाडीवर आला आणि संतोषच्या छातीत कैची खुपसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान परिसरातील नागरिकांची गर्दी उसळली होती. याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here