अपहरण करून दोन लाखांची खंडणी उकळणारे अखेर जेरबंद

वर्धा : हिंगणघाट येथून वर्धेच्या दिशेने येत असलेल्या तेतला लक्ष्मीनारायण रेड्डी ह.मु. गजानन नगर वर्धा याला धोत्रा चौरस्ता जवळ काही व्यक्तींनी अडवून धाकदपट करून त्याच्या जवळील ४८ हजारांची रोख हिसकाविली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी तेतला याला बळजबरी वाहनात बसवून त्याचे अपहरण केले. शिवाय दहा लाखांच्या खंडणीची मागणी करून दोन लाखांची खंडणी उकळल्यावर तेतला याला इंझापूर परिसरात सोडून दिले.

याच प्रकरणातील आरोपींना अल्लीपूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने तेलंगाणा राज्यातील रणदिवे नगर, आदिलाबाद येथून अटक केली आहे. शेख मुखीद अहमद शेख युसुफ (३१), सूर्यकांत राम मटपती (३०), शाहरुख पठाण अजीज पठाण (२८), संजय देवन्ना ओसावार (३४), नंदकुमार रामचंद्र शेटे (२८), विठ्ठल पांडुरंग कांबळे (२८) सर्व रा. अदिलाबाद तेलंगाणा असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here