
वर्धा : करंजी भोगे येथील माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य सुनील मधुकरराव भोगे (वय 52) यांनी आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास शेतातील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
माहितीनुसार सुनील भोगे हे वर्धा पंचायत समितीचे माजी सदस्य होते. तसेच करंजी भोगे येथे माजी सरपंच. बापूराव देशमुख सहकारी सूत गिरणी येथे संचालक पदावर होते .
त्याचा पश्चात आई, पत्नी ,एक मुलगी, एक मुलगा, दोन भाऊ, सुना मोठा आप्त परिवार आहे. त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे कारण कळू शकले नाही. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

















































