
आर्वी : पैशाच्या वादातून चौघांनी दोन भावांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. संदीप पंधराम याचा मारोतराव कडू याच्याशी वाद झाला होता. दरम्यान अजय कडू याने संदीपच्या घरी जाऊन अजला वाद का केला असे समजाविले. अजय हा वडिल आणि भावासह बसस्थानकावर आला असता संदीप पंधराम, अमित आत्राम, अंकुश आत्राम, रुपेश राऊत यांनी अजयला अडवून तु माझ्या घराकडे कसा काय आला, असे म्हणत शिवीगाळ करुन तुझ्या वडिलांकडे माजे दारुचे पैसे आहे, असे म्हणत चौघांनी दोन भावांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.















































