साहेब, आम्हाला जगू द्या हो; आधीच “लॉकडाऊन” नं आमच कंबरडं मोडलंय! दंइक्यासमोर शेतकरी हतबल : टरबूज विक्रीच्या गाड्या ठाण्यात

वर्धा : लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शेतमाल कसा विकावा? याच विवंचनेत शेतकरी असताना आता चक्क कृषी विभागाचा परवाना असलेल्या शेतकऱ्यांना पोलीस माल विकण्यास अटकाव करीत असल्याने पोलिसांच्या दंडक्यासमोर शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे.

सोमवारी सकाळी शहर पोलिसांनी शिवाजी चौकातील काही. हातगाड्या चालकांवर कारवार्ड केली. या वेळी शेतकऱ्यांच्याही गाड्या चक्क पोलीस ठाण्यात लावत सुमारे २२ जणांवर कारवाईचा दंडुका उगारल्याने,“साहेब, आम्हाला जगू द्या, लॉकडाऊनमुळे आधीच कंबरडं मोडलंय!” असा आर्त टाहो शेतकऱ्यांसह उपस्थित हातगाड्या चालकांनी फोडला.

प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, हातगाड्या चालक, भाजीविक्रेते आपला माल विकण्यासाठी गर्दी करीत आहेत. अशांवर कारवाईचा दंडुका उगारला जातो आहे. शिवाजी चौक परिसरात सोमवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी सुमारे २० ते २२ हातगाड्यांवरून माल विक्री करणाऱ्यांना पोलीस वाहनात बसवुन शहर पोलीस ठाण्यात आणत कारवाई केली. त्यांच्या हातगाड्यादेखील जप्त केल्या. इतकेच नव्हेतर, वजनकाटेही उचलुन नेले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश्यानुसार कृषी विभागाने शेतकऱ्यांना परवाने देत आपला माल घरपोच विक्री करण्यास मुभा दिली. मात्र, एवढा सगळा माल घरोघरी कसा विकणार, असा प्रश्न अनेकांसमोर पडल्याने शेतकऱ्यांनी एका जागेवर उभे राहून माल विक्री करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी चक्क परवानाधारक शेतकऱ्यांवर कारवाई करीत त्यांची टरबूज भरलेली दोन वाहने थेट पोलीस ठाण्यात लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण होते. सुकळी येथील शेतकरी सचिन डबले आणि जुनोना येथील शेतकरी अजय वाणी यांचे टरबूज भरलेले वाहन पोलिसांनी जप्त करीत पोलीस ठाण्यात लावले. त्यामुळे कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

शिल्लक माल कसा विकावा ?

शिंवाजी चोकात शहर पोलिसांनी सकाळच्या सुप्रारास कारवार्ड करीत रस्त्याकडेला लावण्यात येत असलेल्या भाजीविक्री, फळविक्री करणार्‍या हातगाडी चालकांवर कारवार्ड करीत त्यांच्याकडील वजनकाटे उचलूत नेले. इतकेच नव्हेतर काहींना पोलीस वाहनात बसवून न पोलीस ठाण्यात आणले. तसेच त्यांच्या हातगाड्या आणि टरबूज भरलेली वाहन देखील पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आली. दिवसभर पोलीस ठाण्यात स्थानवद्ध केल्याने शेतकऱ्यांसह विक्रेत्यांना आपला माल कसा विकावा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण आले होते. परिणामी, होणारे नुकसान कोण भरुन देणार, असा सवाल शेतकर्‍यांकडून विचारला जात होता.

दिवसभर केले पोलीस ठाण्यात स्थानवद्ध

शिंवाजी चोंकातील हातगाडीचालक आणि काही शेतकर्‍यांना पोलिसांनी पोलीस ठाण्यासमोरील मंदिरात दिवसभर स्थानबद्ध करून ठेवले. त्यांच्यावर कारवार्ड करीत दंड आकारण्यात आला. त्यामुळे शेतकर्‍यांजवळ असलेला माल ते कसे विकणार? झालेले नुकसान कोण भरून देणार, हे सर्व प्रश्‍न अनुत्तरित असून शेतकर्‍यांमध्ये रोषाचे वातावरण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here