ट्रॅक्टरवरून पडल्याने इसमाचा मृत्यू! चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : ट्रॅक्‍टरवर बसून गावातून खरांगणाकडे जात असताना संजय पारिसे यांच्या शेताजवळ ट्रॅक्टरवर उसळून खाली दगडावर पडल्याने इसमाचा मृत्यू झाला. ही घटना 23 जून रोजी 8 वाजता काचनुर येथे घडली. सोमेश्‍वर दयाराम पंधराम (40) रा. काचनुर असे मृतकाच नाव आहें.

चालकाने ट्रॅक्टर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्यामुळे ट्रॅक्टरवरून उसळल्याने सोमेश्‍वर पंधराम यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी हरिश क्रष्णाजी उमक रा. पिंपळखुटा भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवर आरोपी नीतेश तुकाराम पंधराम (वय 35) रा. काचनुर याच्याविरुद्ध खरांगणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here