३ लाख ४८ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त! सालोड बायपास वळण रस्त्यावरील कारवाई

वर्धा : कारमधून मोठ्या प्रमाणात दारूसाठा वर्धा शहरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता पोलिसांनी सालोड वळण रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाजवळ नाकाबंदी करून भरधाव वाहनाला थांबवून विदेशी दारूसाठा जप्त केला. तसेच दोन आरोपींना अटक करून सावंगी ठाण्यात गुन्हा दाखल केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी सालोड वळण रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाजवळ नाकाबंदी केली असता पुलगावकडुन भरधाव एम.एच. ४३ आर. ३९२ क्रमांकाची कार येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवून पाहणी केली असता विदेशी दारूसाठा दिसून आला. पोलिसांनी याप्रकरणी अक्षय विजय खडसे, रा. हिंद नगर आणि आकाश पुरुषोत्तम पुसदेकर, रा. गणेशनगर यांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध सावंगी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलीस उपनिरीक्षक सौरभ घरडे, संतोष दरगुडे, स्वप्नील भारद्वाज, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टणकर, नवनाथ मुंडे, दिनेश बोथकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here