

वर्धा : मच्छी पकडण्यासाठी टाकलेले जाळे उचलण्याकरिता गेलेल्या 55 वर्षीय इसमाचा आर्वी तालुक्यातील टाकरखेडा गावालगतच्या नदीपात्रात बुडून मुत्यू झाला. ही घटना रविवार 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली. रामभाऊ पांडुरंग मेश्राम (वय 55) रा. टाकरखेडा ता. आर्वी असे मृताचे नाव आहे.
रामभाऊ मेश्राम हे 1 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता गावालगत असलेल्या वर्धा नदीवर मच्छी पकडण्याकरिता टाकलेले जाळे उचलण्याकरिता सोबत ट्युब घेऊन गेले होते. परंतु, खूप वेळ होऊनही वडील घरी परतले नाही म्हणून त्यांचा मुलगा राजेंद्र हा दुपारी 2 वाजताच्या दरम्यान, वर्धा नदीवर गेला. पण, त्याला तेथे वडील दिसून आले नाही. दुसर्या दिवशी 2 जानेवारीला नदीकडे पाहण्याकरिता गेले असता नदीच्या काठावर रामभाऊ यांचा म्रतदेह तरंगताना दिसून आला. या प्रकरणी राजेंद्र भाऊराव मेश्राम रा. टारखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आवी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.