मोटरसायकल खांबावर धडकली पती-पत्नी ठार; करंजी (भोगे) जवळची घटना

वर्धा : वळनरस्त्यावरुन जात असताना भरधाव वेगात जाणारी दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलवर जाऊन आदळली यात दोघे पति-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना रविवार (ता. १७) करंजी (भोगे) गावाजवळ दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. जनार्धन धाबेकर वय ४५ वर्षे, माधुरी धाबेकर वय ४० वर्षे रा. वार्ड क्रमांक १, नाचणगाव असे ठार झालेल्या पति-पत्नीचे नाव आहे.

जनार्धन आणि त्याची पत्नी एमएच २७ बीएच २३६१ क्रमांकाच्या दुचाकीने साक्षगंधाच्याय कार्यक्रमाला पुजई येथे जात होते दरम्यान करंजी (भोगे) नजीक वळनरस्त्यावर दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर जाऊन आदळली. यात दोघेही पति-पत्नी जागीच ठार झाले. या घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसाना मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here