अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू! पवनार हायवेवरील घटना

पवनार : रोड ओलांडतांना भरधाव वेगात येणार्या अज्ञात कारने धडक दिल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता. १७) पवनार येथील बसस्थानक परिसरात साडेसहा वाजताच्या सुमारास घडली घडली. कुसुम ताराचंद नगराळे (वय ७०) वर्षे रा. पवनार असे मृत महिलेचे नाव आहे.

कुसुम नगराळे या बांगडे ले-आउट येथून जुन्या वस्तीतील बुद्ध विहाराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना अज्ञात कार चालकाने त्यांना जोरदार धडक दिली यात त्या गंभीर जखमी झाल्या. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत असल्याचे बघताच कार चालकाने घटना स्थळावरून पळ काढला. नागरिकांनी तत्काळ कुसुम नगराळे यांना उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here