शिरपुरात वीज पडून पाच शोळ्या दगावल्या! एका व्यक्तीसह दोन दोळ्या गंभीर जखमी

आर्वी : आर्वी तालुक्यातील शिरपूरपासून दीड कि.मी. अंतरावर वीज कोसळल्याने पाच शेळ्यांचा मृत्यू झाला, तर एका व्यक्तीसह दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. जखमी व्यक्तीला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

वीज पडून मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळताच शिरपूरचे पोलीस पाटील मंगेश डाखोरे यांनी सदर माहिती तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांना दिली. त्यानंतर पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. कोहाडे, तलाठी अनुराधा कदम, कोतवाल मनोज नाखळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गंभीर जखमी झालेल्या जानराव नेमाडे याला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेत भास्कर सुदाम डांगे यांच्या मालकीच्या दोन शेळ्या ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली. तसेच शेख मेहमुद शेख रुस्तम यांची एक शेळी गतप्राण झाली तर शेख आपद शेख बल्लू व शेख फरीद शेख करीम याची प्रत्येकी एक शेळी मरण पावली. तर शेख फरीद शेख करीम यांची एक शेळी जखमी झाल्याने एकूण ८० हजारांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. नुकसानग्रस्तांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. या घटनेची नोंद तालुका प्रशासनाने घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here