माध्यमातील महिलांची प्रतिमा! विषयावरील संशोधनाचा अहवाल कुलगुरु प्रो.शुक्ल यांना सादर

वर्धा : ‘माध्यमातील महिलांची प्रतिमा’ या विषयावरील संशोधनाच्या अहवालाची प्रत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांना स्त्री अध्ययन विभागाच्या एसोसिएट प्रोफेसर डॉ. सुप्रिया पाठक यांनी सादर केली.

याप्रसंगी प्र-कुलगुरु प्रो. चंद्रकांत रागीट, कुलसचिव कादर नवाज खान, प्रो. सी. एन. तिवारी, डॉ. अनिल कुमार दुबे, डॉ. अनवर अहमद सिद्दीकी, डॉ. सूर्य प्रकाश पांडे, डॉ. राजेश लेहकपुरे, डॉ. अनिकेत आंबेकर व डॉ. हरीश पांडे उपस्थित होते.

मीडियाची प्रतिमा आणि जीवन यथार्थ: परिघातील महिलांच्या विशेष संदर्भात’ या विषयावर भारतीय सामाजिक अनुसंधान परिषद्, नवी दिल्ली द्वारा प्रायोजित संशोधन प्रकल्पा अंतर्गत स्त्री अध्ययन विभागाच्या एसोसिएट प्रोफेसर डॉ. सुप्रिया पाठक व त्यांच्या सहका-यांनी एक अहवाल तयार केला असून यात महिला, त्यांची सामाजिक भूमिका, समाजात त्यांचे आर्थिक योगदान, कौटुंबिक कामकाज, राजकीय-सांस्कृतिक भागीदारी यावर शोध केला गेला.

या संशोधनाकरिता नवी दिल्ली, पटना, बनारस, हैदराबाद, सासाराम, भागलपूर, नागपूर, वर्धा, गुलबर्गा तसेच महाराष्ट्रातील नालवाड़ी, कारंजा, गणेशपुर, आर्वी, पिपरी, शेगांव, बोरखेडी, देवली, कारला आणि बिहारमधील पटखैलिया, बभनगावॉं, नसेज, बैद्यनाथपुर, परसथुवॉं, कुदरा, मोहनियॉं, पट्टी, करमा, अहिरवलिया, मझौल, बिहियॉं, जग‍दीशपुर, रजौन, कामदेवपुर, सीढी, चांदपूर या भागातील महिलांवर प्रामुख्याने शोध करण्यात आला. या शोध कार्यात डॉ. अवंतिका शुक्ला, डॉ. आशा मिश्रा, श्री शरद जयसवाल, सुश्री चेतना शुक्ला, डॉ. सत्यम सिंह व डॉ. वरुण कुमार यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here