
वर्धा : बहुजन समाज पार्टी, वर्धा जिल्ह्याच्या वतीने बसपा कार्यालय वर्धा येथे बसपाच्या वतीने निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जऊरवाडा येथील सरपंच तुलारामजी गायकवाड, उपसरपंच वनमाला कुमेरिया, ग्रामपंचायत सदस्य नीताताई भलावी. माटोडा बेनोडा येथील उपसरपंच विनोद वंजारी, ग्रामपंचायत सदस्य विना मोरेश्वर मेश्राम, शोभा श्रीधर कांबळे, स्नेहा देवेंद्र मनवर, मंदा राजेंद्र कांबळे, लाहोरी येथील सरपंच प्रज्ञा दीपचंद कोंबडे, उपसरपंच रोशन धुर्वे, ग्रामपंचायत सदस्य सुदेश जवादे, पल्लवी रोशन मडावी. सर्व नवनियुक्त सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा बैठकित 15 मार्च मान्यवर कांशीराम साहेब जयंती कार्यक्रमात येणाऱ्या नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल फुकणार तरी सर्व कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करावे व येणाऱ्या सर्व निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणावे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चारही विधानसभेत साजरी करावी असे विचार जिल्हा अध्यक्ष मोहन राईकवार यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील हजारे, महासचिव अनोमदर्शी भैसारे, जिल्हाप्रभारी मनीष चवरे, सुरेश नगराळे, विनोद वंजारी, कोषाध्यक्ष नाझीम शेख,जिल्हा सचिव दीपक भगत, विधानसभा अध्यक्ष अँड. अभिषेक रामटेके, सुनील देशमुख, रवी भगत, सोनू मेंढे, महासचिव दिनेश वाणी,विलास कांबळे, अरुण शंभरकर, मधुकर सोनटक्के, शहर अध्यक्ष जयंत वासनिक, विनोद बोरकर, शेखर म्हैसकर, रोशन मसराम, राजेंद्र कांबळे, श्रीधर कांबळे, अनिकेत राठोड. इत्यादी कार्यकरते यावेळी उपस्थित होते.