
हिंगणघाट : नागपूर येथून मुलांना भेटण्यासाठी आलेल्या वडिलांना पत्नीसह तिच्या आईने मारहाण करून हकलून लावले. काझी वॉर्ड परिसरात ही घटना घडली, पंकज दिवाकर डोंगरे आणि पत्नी यांच्या घटस्पोटाची केस कोर्टात सुरू आहे. पंकज हा मुलांना भेटण्यासाठी पत्नीच्या माहेरी गेला असता मुलांना भेटण्यास मनाई करून पंकजला मारहाण केली. याप्रकरणी प्रियंका शेंडे, वंदना नंदागवळी यांच्याविस्द्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.


















































