Home ◼️ संपादकीय दोन ट्रकला एकाच क्रमांकाची प्लेट

दोन ट्रकला एकाच क्रमांकाची प्लेट

वर्धा : दोन ट्रकला एकच नंबर प्लेट वापरून चंद्रपूर येथून रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त केले. ही कारवाई सेलू पोलिसांनी केली. या प्रकरणात इर्शाद खां सिकंदर खा पठाण (५०, सेलू) व अमित लीलाधर कुरके (४०, रा. महाबळा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी हे शासनाची दिशाभूल करीत दोन ट्रकवर एकच नंबर एमएच ३२ एएस २७८६ चा वापर करत चंद्रपूर जिल्ह्यातील रगपोचन रेती घाटातून अवैध रेतीची वाहतूक करीत होते. पोलिसांनी कारवाई करत ७५ लाख २१ हजार २५० रुपयांचे दोन्ही ट्रक जप्त करीत गुन्हा नोंद केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!