

वर्धा : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात लिपिकाच्या मनमानी कारभारामुळे वाहनधारक त्रस्त झालेले आहे कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाहन हस्तांतरणाचे काम थांबवल्या जात असल्याने वाहनधारकांना आरटीओ कार्यालयाचे हेलपाटे खावे लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेले आहे मात्र या लिपिकेचा हेखेखोरपणा अजूनही कायम आहे.
कार्यालयाची वेळ सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंतची असताना या ठिकाणी वाहन हस्तांतरणाच्या कामासाठी येणाऱ्या वाहनधारकांना दुपारी अडीच वाजनंतर हाकलून लावण्यात येते असल्याचा प्रकार सध्या आरटीओ कार्यालयात चर्चेचा विषय बनलेला आहे विशेष म्हणजे या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री देशमुख यांनी वाहनधारकांना बिफोर साइन करण्यासाठी येण्याची वेळ सकाळी साडेदहा ते साडेतीन राहील असा फर्मान सोडण्यात आले आहे. तसा बोर्डही या लीपिकाने कार्यालयात लावलेला आहे. विशेष म्हणजे या वेळेच्या आत म्हणजे 2.30 वाजता जरी कुणी वाहनधारक येत असेल तरी त्याला हा लिपिक हाकलून लावतो.
वाहन हस्तांतरणाच्या कामाकरता वाहन मालकाला येथील लिपिका समोर आपले मूळ कागदपत्र घेऊन ओळखपत्रासहित अधिकाऱ्यांसमोर सही करावी लागते त्यानंतर वाहन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडल्या जाते याकरता दूरवरून वाहनधारक येतात आष्टी, आर्वी, कारंजा या तालुक्यातून येणाऱ्या वाहनधारकांना किमान अडीच ते तीन तास येण्यासाठी लागतात त्यामुळे वाहनधारक अडीच तीनच्या नंतर या कार्यालयात आले तर त्यांना आल्यापावली या कार्यालयातून हाकलून देण्यात येते या या प्रकाराने वाहनधारकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.
प्रतिक्रिया….
मी 80 किलोमीटर अंतरावरून वडकी तालुका राळेगाव येथून आरसी बुकची दुय्यम प्रत काढण्याकरता आरटीओ कार्यालयात साडेतीन वाजता आलो असता येथील एका कर्मचाऱ्याने अडीच वाजताच्या नंतर हे काम होत नाही असे सांगून हाकलून लावले. त्यानंतर येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी अर्जावर स्वाक्षरी करून दिली आणि लिपिकाला माझे काम करून देण्याचे आदेश दिले. ५ मिनिटांपेक्षा कमी वेळात मझ काम झालं मात्र या लीपिकांच्या मनमानी कारभाराला मनस्ताप झाला.
मंगेश पवार, रा. वडकी ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ