दारू पिऊन धिंगाना घालनार्याची पोलिसात तक्रार दाखल

वर्धा : दारुच्या नशेत येत परिसरात धिंगाना घालनार्या व्यक्तिची रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंदी मेघे येथील फिर्यादी सुरेश हा रोज मजुरीचे काम करीत असून रात्री 8 वाजताच्या दरम्यान घरासोमोर उभे असता, एक इसम तिथे येऊन दारू पिऊन धांदल करीत होता, त्याने विनाकारण फिर्यादीला लाकडी दांडूने शिवीगाळ करीत मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाला. याप्रकरणी फिर्यादी यांनी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सदर इसमाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here