वणा नदीत मिळाला तरुणीचा मृतदेह! पुलाजवळ आढळली लेडीज बॅग

हिंगणघाट : शहरातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदीच्या पुलावर एका इसमाला सोमवारी सायंकाळी लेडीज बॅग पडून असल्याचे आढळून आले. त्याबाबतची माहिती त्या व्यक्‍तीने वडनेर पोलिसांना दिल्यावर हिंगणघाट व वडनेर पोलीसही ऑक्टिव्ह मोडवर आले आहेत. तरुणीने वणा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली असावी असा कयास बांधून पोलिसांकडून तरुणीचा शोध घेतला. जात असतानाच सायंकाळी उशीरा तरुणीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. धनेश्वरी उर्फ आशू प्रविण मेंढे (२६) रा. वीर भगतसिंग वॉर्ड हिंगणघाट असे मृताचे नाव आहे.

वडनेर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळ हिंगणघाट पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने माहिती हिंगणघाट पोलिसांना देण्यात आली. तेव्हा हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वणा नदी पुलाजवळ जाऊन या प्रकरणाची शाहनिशा केली असता लेडीज बॅग आढळून आली. मात्र सुरूवातीला याठिकाणी कोणतीही तरुणी आढळून आली नाही. या तरुणीने वणा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असावी अशा संशयावरून मंगळवारी पोलिसांनी वणा नदीपात्रात शोधकार्य सुरू केले. हे शोधकार्य उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम व पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गिरीधर पॅदोर, सोमनाथ टापरे यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत असताना आशु मेंढे या तरुणीचा मृतदेह सापडला. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here