
वर्धा : वर्धेकडून आर्वीकडे ४५ प्रवासी घेऊन निघालेली आर्वी आगाराची बस धाम नदीचे कठडे तोडून आत घुसली. सुदैवाने बस बंद झाल्याने बसचा अर्धा भाग पुलाच्या खाली तर अर्धा भाग रस्त्यावर राहिल्याने भीषण अपघात टळला. ही घटना आज २८ रोजी ७.४५ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार आर्वी आगराची एम एच ४० ५२९७ क्रमांकाची राज्य परिवहन मंडळाची वर्धा आर्वी वरुड बस ७.३० वाजता वर्धा बस स्थानकातून प्रवासी घेऊन निघाली. वर्धेपासून १० किमी अंतरावर चालकाचे बस वरून नियंत्रण सुटल्याने येळाकेळी नजीकच्या धाम नदीवर बांधलेल्या नदीचे कठडे तोडून आत गेली. सुदैवाने अर्धी बस कठड्यांमध्ये अडकल्याने मोठा अपघात टळला. अपघाताची माहिती कळताच संजय बाराहाते, मंगेश भांडेकर, देवराव घोंगडे शुभम गुंडे, किरण घोंगडे , ग्रामपंचायत सदस्य हितेश भांडेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर प्रवाशाचे प्राण वाचवले.




















































