शिवीगाळ करीत युवकाला मारण्याची दिली धमकी! पोलीसात तक्रार दाखल

वर्धा : शिवीगाळ करीत मारण्याची धमकी देत. खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी युवकाला देण्यात आली. तरोडा येथे ही घटना घडली. अविनाश कुमार प्रेमकुमार श्रीवास्तव हा कंपनीकडे जात असताना भानुदास सोनुलकर, अमोल सोनुलकर, बंडू पवार, नरेश चव्हाण यांनी कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावर दगडं टाकून रस्ता बंद केला.

इतेकच नाही तर चौघांनी शिवीगाळ करुन विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी खरांगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या मारहाणीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली असून अगदी क्षुल्लक वाद जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here