शाळांनी केवळ शैक्षणिक शुल्क आकारावे! पंचायत समितीत सर्वानुमते ठराव पारित; पालकांना दिलासा

पवनार : कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मात्र, खासगी शाळांकडून अवास्तव शुल्क आकारल जात. असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात आली होती. याची दखल घेत केवळ शैक्षणिक शुल्क आकारण्यात यावे, असा ठराव पं.स. सदस्य प्रमोद लाडे यांनी सभागृहात मांडला होता. हा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.

विद्यार्थी शाळेत जात नसल्याने शैक्षणिक शुल्क आकारण्या व्यतिरिक्त इतर शुल्क आकारण्याची गरज नसल्याचे ठरावात नमूद करण्यात आले. जि.प. शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या ५० टक्‍क्‍यांच्या वर पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल नसल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाला अर्थ उरत नाही.

पवनार येथे जि.प.च्या दोन शाळा असून २५९ विद्यार्थ्यांपैकी १२१ विद्यार्थ्यांचा पालकांकडे अँड्रॉइड मोबाइलची सुविधा आहे. सध्या मोबाइलवर अभ्यासक्रम पाठविणे सुरू असून १३८ विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नसल्याने ग्रृहपाठापासून वंचित राहतात. त्यांना टप्प्याटप्प्याने गृह भेटी देणे आवश्‍यक असल्याचे प्रमोद लाडे यांनी ठरावात नमूद केले. याबाबत पंचायत समिती स्तरावर कार्यवाही होण्यासाठी सदर ठराव पारित झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here